भिवंडी महापालिकेचे दोन कर्मचारी निलंबित; विनापरवानगी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:11 IST2018-11-20T00:11:14+5:302018-11-20T00:11:29+5:30
कामावर गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीट निरीक्षक धनजी चव्हाण व लिपिक प्रतीक गायकवाड अशी कारवाई झालेल्या कर्मचा-यांची नावे आहेत.

भिवंडी महापालिकेचे दोन कर्मचारी निलंबित; विनापरवानगी गैरहजर
भिवंडी : कामावर गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीट निरीक्षक धनजी चव्हाण व लिपिक प्रतीक गायकवाड अशी कारवाई झालेल्या कर्मचा-यांची नावे आहेत.
मागील आठवड्यात आढावा बैठकीला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रभाग समिती-४ चे बीट निरीक्षक धनजी चव्हाण गैरहजर राहिले. तसेच करवसुलीत ते कोणतेही सहकार्य करत नसल्याने आयुक्त मनोहर हिरे यांनी त्यांना निलंबित केले. तसेच प्रभाग समिती क्र.-५ मधील लिपिक प्रतीक गायकवाड हे गेल्या दोन महिन्यांपासून रजेचा अर्ज न देता विनापरवानगी गैरहजर राहिले आहेत. त्यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याने त्यांनाही आयुक्त हिरे यांच्या आदेशान्वये उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी निलंबित केले. करवसुलीच्या कामात हयगय करणाºया कर्मचाºयांविरुद्ध आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्याने कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.