शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत इमारतीचा भाग कोसळून दाेघांचा मृत्यू, महिला सुखरुप बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 08:20 IST

Dombivli building collapse: डोंबिवली येथील पूर्वेकडील आयरे रोड लक्ष्मणरेषा परिसरातील आदिनारायण भुवन या अतिधोकादायक इमारतीचा भाग शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळला. यात तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले हाेते.  

डोंबिवली - येथील पूर्वेकडील आयरे रोड लक्ष्मणरेषा परिसरातील आदिनारायण भुवन या अतिधोकादायक इमारतीचा भाग शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळला. यात तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले हाेते.   दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. तर एकाचा रात्री ढिगाऱ्याखाली मृतदेह मिळाला. 

केडीएमसीचे अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) यांच्याकडून बचावकार्य सुरू होते. रात्री आठच्या सुमारास तिघांपैकी सुनील  लोढीया यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले, मात्र त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.  दीप्ती लोढीया (४५) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अरविंद भाटकर (७०) यांचा शोध सुरू हाेता. त्यांचा रात्री मृतदेह मिळाला. इमारत रिकामी करताना मनपा कर्मचाऱ्यांच्या पथकासमोरच इमारतीचा भाग कोसळला. तळमजला अधिक तीन मजल्यांच्या इमारतीत ४० खोल्या होत्या.  

दाेघे आजारी अडकले आणि...  - दीप्ती लोढीया (४५) आणि अरविंद भाटकर (७०) हे दोघे आजारी हाेते तसेच बेडवरच उपचार घेत असल्याने बाहेर पडू शकले नाहीत. इमारतीचा तीन मजली भाग कोसळताच त्याखाली हे दोघेच अडकल्याची माहिती मिळाली, परंतु खोदकामात अन्य अनोळखी व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. - गंभीर अवस्थेत बाहेर काढलेले दीप्ती यांचे पती सुनील लोढीया असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले, मात्र सुनील लोढीया यांचा मृत्यू झाला.

पत्नी आणि मुलगा घराबाहेर पडले; पण...ढिगाऱ्याखाली अडकलेले ७० वर्षीय अरविंद भाटकर हे आजारी असल्याने घरीच बेडवर झोपले होते, तर त्यांची पत्नी आणि मुलगा रूम शोधण्यासाठी घराबाहेर पडले होते. तेवढ्यात ही इमारत कोसळली. घराबाहेर पडल्याने दोघांचा जीव वाचला पण अरविंद हे मात्र आजारी असल्याने घराबाहेर पडू शकले नाहीत. 

दैव बलवत्तर म्हणून ते बचावले- इमारतीलगत चाळ आहे. चाळीतील रहिवाशांना देखील खोल्या रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. इमारतीला लागूनच असलेल्या चाळीच्या खोलीत शोएब मलिक हा तरुण आपल्या दोन मित्रांसह राहत होता. - संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शोएब मित्रांसोबत घराबाहेर पडला आणि अवघ्या काही मिनिटातच ही इमारत कोसळली. पुन्हा तो घराच्या दिशेने परतला असता घरावर कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा पाहून तो थक्क झाला.  

अधिकारी बचावलेप्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख सहा ते सात कर्मचाऱ्यांच्या पथकासह इमारत रिकामी करण्यासाठी गेले होते. त्यांनी इमारतीतील बहुतांश रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, अधिकारी इमारतीबाहेर येऊन काही अंतरावर आले असता इमारत पत्त्यासारखी कोसळली. डोळ्यासमोर घडलेल्या घटनेमुळे अधिकारीवर्ग देखील सुन्न झाला होता. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाdombivaliडोंबिवली