शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांनी पाडणार पत्रीपूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:06 IST

वाहतुकीसाठी अतिधोकादायक असलेला कल्याणचा जुना पत्री पूल पाडण्याची कारवाई दोन दिवसांनी सुरु केली जाणार आहे

कल्याण : वाहतुकीसाठी अतिधोकादायक असलेला कल्याणचा जुना पत्री पूल पाडण्याची कारवाई दोन दिवसांनी सुरु केली जाणार आहे. याठिकाणी नव्या पुलाचे बांधकाम सुरु होणार असून, त्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.जुन्या पत्री पुलासंदर्भात मंगळवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीस राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राम जैस्वार यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त, रेल्वे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. जुना पत्री पूल वाहतुकीसाठी तीन दिवसांकरीता बंद राहिल. पुलावरील महापालिकेचे पथदिवे, वीजवितरण कंपनीच्या केबल्स आणि अन्य सेवावाहिन्या काढून घेण्याची कारवाई तीन दिवसांमध्ये केली जाईल. पूल पाडण्याचे काम तीन दिवसांनी हाती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेला नवा पूल आणि जुना पूल या दोहोंमध्ये नवा पूल प्रस्तावित आहे. रेल्वेकडून मंजुरी आल्यानंतर पूल पाडल्यापासून पंधरा दिवसाच्या आत नव्या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. नव्या पुलाचे काम तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या कामासाठी खर्चाच्या तरतुदीची समस्या नाही. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आलेली आहे. याच खर्चातून नवा पूल उभारणे प्रस्तावित आहे. हे काम तातडीने पूर्ण केले जाईल. जुना पत्री पूल पाडल्यानंतर दरम्यानच्या काळात या पुलावरील हालक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार का, असा सवाल पोलिस यंत्रणेकडे उपस्थित केला असता, पर्यायी मार्गच नसल्याने आहे नव्या पूलावरुनच वाहतूक सुरु राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.पत्री पूल होणार इतिहासजमा : जुना पत्री पूल १९१४ साली ब्रिटिशांनी उभारला होता. १०४ वर्षे जुना हा पूल म्हणजे शहराची ओळख आहे. काळाच्या ओघात नागरीकरण वाढले. लोकसंख्या वाढली. सोबतच वाहनांची संख्याही वाढली. त्याचा ताण पत्री पुलावर आला. त्यामुळे पूल धोकादायक झाला. मात्र १०४ वर्षे तग धरून असलेला हा पूल ब्रिटिशांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा नमुना आहे. ब्रिटिशांनी बांधलेल्या पत्री पुलाची योग्य देखभाल ठेवण्यात आली नाही. त्यामुळे हा पूल तोडण्याची वेळ आली.

टॅग्स :kalyanकल्याणrailwayरेल्वेroad transportरस्ते वाहतूक