विद्यापीठात दोन दिवसीय राउंड टेबल परिषद
By Admin | Updated: September 22, 2014 01:45 IST2014-09-22T01:45:31+5:302014-09-22T01:45:31+5:30
मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कलिना कॅम्पसमध्ये दोन दिवसीय राऊंड टेबल परिषद

विद्यापीठात दोन दिवसीय राउंड टेबल परिषद
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कलिना कॅम्पसमध्ये दोन दिवसीय राऊंड टेबल परिषदेचे आयोजन केले आहे. विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांच्या अध्यक्षतेखाली २९ ते ३० सप्टेंबर रोजी ही परिषद होणार आहे. ‘मीडिया शिक्षण : समस्या, आव्हाने आणि भवितव्य’ या विषयावर या परिषदेमध्ये चर्चा होईल.
जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलाची दखल घेत विचार आणि संकल्पना यांचीही देवाणघेवाण होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने कालपरत्वे माध्यम शिक्षण हे कसे असावे, माध्यमांसमोरील आव्हाने आणि माध्यमांचे भवितव्य कसे असणार या विषयांवर सखोल विवेचण आणि चर्चा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या वतीने दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)