आगीत दोन डान्सबार खाक

By Admin | Updated: February 22, 2017 06:23 IST2017-02-22T06:23:57+5:302017-02-22T06:23:57+5:30

कल्याण-श्रीमलंग मार्गावरील ‘रंगीला’ आणि ‘कशीश’ हे दोन मंगळवारी मध्यरात्रीच्या

Two dance bars blaze in the fire | आगीत दोन डान्सबार खाक

आगीत दोन डान्सबार खाक

कल्याण : कल्याण-श्रीमलंग मार्गावरील ‘रंगीला’ आणि ‘कशीश’ हे दोन मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कशीश बारला आग लागली. ती बाजूलाच असलेल्या रंगीला बारमध्येही पसरली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दोन तासांनी आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत हे दोन्ही बार भस्मसात झाले. या आगीत बारचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Two dance bars blaze in the fire