शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या दोन लाचखोर लिपिकांना लाच घेताना रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:19 IST

घराचे बांधकाम पाडण्याची धमकी देऊन लाच घेणाऱ्या ठाणे महापालिकेच्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी अटक केली.

ठळक मुद्देतीन हजार रूपये घेतलेबांधकाम पाडण्याची दिली धमकीतपास सुरू

ठाणे : महापालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. घराचे बांधकाम न पाडण्यासाठी त्यांनी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारली.वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयातील लिपिक किशोर हिरामण झेंडे आणि अरविंद चंद्रकांत जैस्वार ही आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराचा बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांचे वागळे इस्टेट भागामध्ये घरांचे बांधकाम होते. हे बांधकाम न पाडण्यासाठी किशोर झेंडे याने तक्रारदारास पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराच्या बांधकामाबाबत त्याला महापालिकेने कोणतीही रितसर नोटीस बजावली नव्हती. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार किशोर झेंडेला भेटला असता त्याने पुन्हा लाचेची मागणी केली. तीन हजार रुपयांमध्ये या प्रकरणाची तडजोड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी ३ वाजता तक्रारदार आरोपीला ३ हजार रुपयांची लाच देण्यासाठी रायलादेवी प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर गेले. यावेळी किशोर झेंडने लाच घेण्यासाठी स्वत: न जाता, वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयातील लिपिक अरविंद चंद्रकांत जैस्वार याला पाठवले. या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक संजय सादिगले यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना अरविंद जैस्वारला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचेची मागणी किशोर झेंडेने केल्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग