शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एकाच खोलीत दोन वर्ग; विद्यार्थी शिकतात रडतखडत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:44 IST

सफाळेत धोकादायक शाळा पाडली; वर्ष उलटले तरी ढिगारा तसाच पडून

- रवींद्र घरतलोकमत न्यूज नेटवर्क सफाळे : सफाळे गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक बनल्याने वर्षभरापूर्वी पाडण्यात आली. मात्र, ती अद्याप बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे एका खोलीत दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोंबून शिकवले जात आहे. शाळेची इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे निधी नसल्याने विद्यार्थ्यांवर ही वेळ आल्याचे सांगण्यात येते.

साधारण वर्षभरापूर्वी धोकादायक वर्गखोली पाडण्यात आली. मात्र, ती पुन्हा बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न केले नाहीत. आता पावसाळा असल्यामुळे बांधकाम करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना आणखी किती दिवस एकाच वर्गात  बसून शिकावे लागणार, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. जिल्हा परिषदेकडे रस्ते व इतर कामांसाठी निधी असतो, मग विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शाळेच्या इमारतीसाठी निधी का उपलब्ध होत नाही, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.

फाइल बघून सोमवार वा मंगळवारी माहिती देते!जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. एक वर्षापूर्वी या शाळेचा वर्ग धोकादायक असल्याने पाडण्यात आला, तर दुसऱ्या दोन वर्गखोल्यांमध्ये पाणी गळती होत असल्याने दुरुस्ती करण्यात आली होती. वर्षभरात जिल्हा परिषदेने एकही वीट रचलेली नाही. याबाबत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सोनाली मतेकर यांनी  “मी फाईल बघते, सोमवारी किंवा मंगळवारी माहिती देते”, असे सांगितले.

प्रशासनाने वेळेत बांधकाम पूर्ण न केल्याने विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागत आहे. ही बाब गंभीर आहे. यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी. मनीषा  निमकर, माजी सभापती, पालघर जिल्हा परिषद

सफाळे शाळेत चौथीपर्यंत वर्गखोल्या आहेत. त्यांची पटसंख्या ४४ असल्यामुळे तिथे वर्गखोली बांधणे शक्य नाही. कृष्णादेव सपटाले, सर्व शिक्षण अभियान, बांधकाम विभाग

टॅग्स :Schoolशाळा