भिवंडीत दोघा भावांना विवस्त्र करून केला छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:23 AM2019-10-31T00:23:43+5:302019-10-31T00:23:56+5:30

अस्लम हसन रजा अन्सारी (२३) हा इसम या दोन्ही भावांना जबरदस्तीने चिंचेच्या झाडाखाली घेऊन गेला.

Two brothers were molested by a stranger in a scuffle | भिवंडीत दोघा भावांना विवस्त्र करून केला छळ

भिवंडीत दोघा भावांना विवस्त्र करून केला छळ

googlenewsNext

भिवंडी : तरणतलावात पोहून घरी जात असणाऱ्या दोघा भावांना वाटेत अडवून त्यांच्यावर परतीच्या मार्गावरील तलावातील मच्छी चोरल्याचा खोटा आरोप करून त्या दोघांना चिंचेच्या झाडाला बांधून त्यांचा अमानुष छळ केल्याची घटना तब्बल सहा महिन्यांनंतर उघड झाली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबतचा तपशील असा की, या घटनेतील फिर्यादी (नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) व त्याचा भाऊ शहरातील टावरे स्टेडियम येथील जलतरण तलावात एप्रिल २०१९ मध्ये पोहण्यासाठी गेले होते. पोहून झाल्यानंतर दिवानशाह दर्गा येथून घरी जात असताना त्याच परिसरात राहणारा अस्लम हसन रजा अन्सारी (२३) हा इसम या दोन्ही भावांना जबरदस्तीने चिंचेच्या झाडाखाली घेऊन गेला. त्यानंतर या ठिकाणी नाजीम फारुकी (३२) याने येऊन दिवानशाह दर्गा परिसरातील तलावातील मच्छी पकडण्यास मनाई आहे, असे तुम्हाला वारंवार सांगितले तरी तुम्ही मच्छी पकडता, असा आरोप केला.

या वेळी या ठिकाणी हाफिज मुसाफ अंसारी (१७) व आलीम हाही उपस्थित होता. या वेळी अस्लम, नाजीम, हाफिज व आलीम यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या भावाच्या अंगावरील कपडे काढून भावाच्या गुप्तांगाशी छेडछाड केली. त्यानंतर एका प्लास्टीकच्या बाटलीतून साप आणून तो या दोघांच्या अंगावर सोडला. घडलेल्या प्रकाराचे मोबाइलवर शूटिंग करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

मानसिक ताण वाढला
या शारीरिक छळवणुकीमुळे व त्याचा व्हीडीओ व्हायरल केल्यामुळे मानसिक ताण वाढल्याने दोन्ही भावांनी थेट भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला प्रसंग पोलिसांना सांगताच भोईवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Web Title: Two brothers were molested by a stranger in a scuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस