दोन भावांचे अपहरण, एकाचा मृतदेह मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:41 IST2020-09-30T00:41:14+5:302020-09-30T00:41:37+5:30

चोरीचा संशय : उल्हासनगरात गुन्हा दाखल

Two brothers were abducted and one was found dead | दोन भावांचे अपहरण, एकाचा मृतदेह मिळाला

दोन भावांचे अपहरण, एकाचा मृतदेह मिळाला

उल्हासनगर : चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोघा भावांचे दुचाकी चोरीच्या संशयावरून रविवारी रात्री १ वाजता मारहाण करून कारमधून अपहरण केले. त्यापैकी एका भावाला नांदिवली गावाजवळ उतरवून दिल्यानंतर, दुसºया भावाचा मृतदेह सोमवारी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळाला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचपाडा येथील एका चायनीज खाद्यपदार्थांच्या हॉटेलमध्ये भरत व राजू थापा हे दोघे भाऊ काम करीत होते. २७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता १० ते १२ जणांच्या टोळक्याने दुचाकी चोरल्याच्या संशयावरून या भावांना मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही कारमध्ये जबरदस्तीने घालून त्यांना तेथून नेले.
या टोळक्याने नांदिवली गावाजवळ रस्त्याच्या बाजूला राजू याला कारमधून उतरवून दिले. भरतला मात्र आरोपी त्यांच्या कारमधून घेऊन गेले. दुसºया दिवशी भरत याचा मृतदेह नेवाळी - मंगरूळ रस्त्यावर मिळाला. त्याचे हातपाय बांधलेले होते. त्यामुळे त्याचा खून झाला असण्याची शक्यता आहे.
राजू याच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two brothers were abducted and one was found dead

टॅग्स :thaneठाणे