दुचाकीचोरीच्या दोन घटना
By Admin | Updated: December 23, 2016 03:04 IST2016-12-23T03:04:52+5:302016-12-23T03:04:52+5:30
शहरात दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना रविवारी सकाळी ज्योतीनगर वसाहतीत घडली. त्यात २५ हजारांची

दुचाकीचोरीच्या दोन घटना
डोंबिवली : शहरात दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना रविवारी सकाळी ज्योतीनगर वसाहतीत घडली. त्यात २५ हजारांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार प्रतेरा वाघेला यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
दुसरी घटना मंगळवारी कोमास्करवाडी येथे घडली. त्यात संदीप कोमास्कर यांची ३० हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दुचाकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)