शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गावठी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:35 IST

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावठी दारुची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांवर ठाणे पोलिसांनी एक मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून वर्तकनगर येथून एका महिलेला तर कोपरीतून एका दारु विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे कोपरी आणि वर्तकनगरमध्ये पोलिसांची कारवाई महिलेकडूनही केली दारु जप्त निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईची मोहीम

ठाणे : गावठी दारूची विक्री करणा-या तंगीबाई साठे (६३, रा. भिमनगर झोपडपट्टी, वर्तकनगर, ठाणे) या महिलेसह दोघांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी वर्तकनगर आणि कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी वेगवेगळे गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.भीमनगर सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागील भागात साठे ही महिला गावठी दारूची विक्री करीत असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांना मिळाली होती. त्या आधारे महिला पोलीस कॉन्स्टेबल पायल धुर्वे यांच्या पथकाने १८ मार्च रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास भीमनगर भागातून एका प्लास्टिकच्या पिशवीतील देशी दारूच्या १५ बाटल्यांसह तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर अन्य एका घटनेमध्ये कोपरीगाव शेलार चाळीच्या बाजूला गावठी दारूची विक्री करणाºया विकास सावंत (३४) याला १८ मार्च रोजी कोपरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल काशिलिंग खरात यांच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून १० लीटर गावठी दारूचा कॅन आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमधील २०० मिली लीटर दारू जप्त केली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीraidधाड