रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST2021-08-15T04:40:51+5:302021-08-15T04:40:51+5:30

डोंबिवली : रेल्वेतील मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असून सततच्या तक्रारींमुळे लोहमार्ग पोलीस हैराण झाले आहेत. अशाच दोन वेगवेगळ्या घटनांतील ...

Two arrested for stealing train passenger's mobile | रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

डोंबिवली : रेल्वेतील मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असून सततच्या तक्रारींमुळे लोहमार्ग पोलीस हैराण झाले आहेत. अशाच दोन वेगवेगळ्या घटनांतील दोन चोरांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

जीवन भिका पिंपळे (५०, रा. डोणगाव, ता-जाफ्राबाद, जि. जालना) व हरिष लक्ष्मण गुप्ता (२०, रा. पी. एल. लोखंडे मार्ग, हनुमान मंदिर,चेंबूर मुंबई) अशी त्या चोरांची नावे असून त्यांनी वेगवेगळ्या प्रवाशांचे मोबाईल चोरले होते. त्यापैकी एकाची किंमत १९ हजार रुपये तर दुसऱ्या घटनेतील २२ हजार ९९० रुपये एवढी किंमत होती. असे एकूण दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. हे दोन्ही आरोपी सराईत चोर असल्याची माहिती मिळाली. दोघांना रेल्वे न्यायालयात हजर केले असूनपुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. शार्दुल यांनी दिली.

---------

Web Title: Two arrested for stealing train passenger's mobile