लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : माजिवडा भागात स्पोर्ट्स सायकलींची चोरी करणाऱ्या सुनील मसे (२०, रा. कापूरबावडी, ठाणे) याच्यासह दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे ३० हजारांच्या तीन सायकली जप्त केल्या आहेत.माजिवडा, कापूरबावडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून स्पोर्ट्स सायकली चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कापूरबावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून तपास सुरू होता. दरम्यान, कापूरबावडी भागातील एक संशयित सुनील मसे याची माहिती या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड आणि पोलीस नाईक जाधव यांना मिळाली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुनील याला आव्हाड यांच्या पथकाने ११ मे रोजी पकडले. त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याची बाब समोर आली. या दोघांकडूनही तीन सायकली जप्त केल्या आहेत. या अल्पवयीन मुलाला भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडी बाल न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यात स्पोर्ट्स सायकलींची चोरी करणारे दोघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 00:24 IST
माजिवडा भागात स्पोर्ट्स सायकलींची चोरी करणाऱ्या सुनील मसे (२०) याच्यासह दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे ३० हजारांच्या तीन सायकली जप्त केल्या आहेत.
ठाण्यात स्पोर्ट्स सायकलींची चोरी करणारे दोघे जेरबंद
ठळक मुद्दे एका अल्पवयीन मुलाचाही समावेश कापूरबावडी पोलिसांची कारवाई