शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

ठाण्यात चरसची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: सव्वा तीन कोटीचे चरस हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:01 IST

कळवा, खारेगाव टोलनाका मार्गे एका लाल रंगाच्या ट्रकमधून ७० ते ८० किलोचा चरस मुंब्रा भागात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने खारेगाव टोलनाका येथे एका ट्रकमधून मंगळवारी सव्वा तीन कोटींच्या चरससह दोघांना अटक केली.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगेल्या वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाºया दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून ६५ किलो २१४ ग्रॅम वजनाचे तीन कोटी २६ लाख सात हजारांचे चरस चरस जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी बुधवारी दिली.कळवा, खारेगाव टोलनाका मार्गे एका लाल रंगाच्या ट्रकमधून ७० ते ८० किलोचा चरस मुंब्रा भागात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार, सहायक पोलीस निरीक्षक मिलीन पिंगळे, उपनिरीक्षक गिरीश गायकवाड, संतोष धाडवे, जमादार तडवी, पोलीस हवालदार सोनवणे आणि पोलीस नाईक शिरोसे आदींच्या पथकाने ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे नाशिक राष्ट्रीय  महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे सापळा लावला. याच सापळयाच्या वेळी संशयित ट्रक त्याठिकाणी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास आला. या ट्रकमधील चालक आणि क्लिनरकडे या पथकाने केलेल्या चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, ट्रकमध्ये केलेल्या कौशल्यपूर्ण तपासणीमध्ये ६५ किलो २१४ ग्रॅम वजनाचे प्रतिबंधित अमली पदार्थ अर्थात चरस आढळले. या कारवाईत ट्रकसहित तीन कोटी ५१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी हे चरस कोणाकडून आणले? त्याची ते कोणाला विक्री करणार होते? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या आणखी काही साथीदारांनाही अटक केली जाणार असल्यामुळे या दोन्ही आरोपींची नावे उघड करता येणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस