सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:46 IST2021-09-21T04:46:09+5:302021-09-21T04:46:09+5:30

ठाणे : गरीब महिलांना हेरून त्यांना शरीरविक्रयासाठी भाग पाडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेसह दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक ...

Two arrested for operating sex racket | सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

ठाणे : गरीब महिलांना हेरून त्यांना शरीरविक्रयासाठी भाग पाडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेसह दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने सोमवारी अटक केली. यामध्ये अडकलेल्या पाच पीडितांची सुटका केली.

या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक महिला दलाल आणि तिचा साथीदार धीरज सिंह याच्या मोबाइलवर कॉल केल्यानंतर आर्थिक मोबदला घेऊन महिला शरीरविक्रयासाठी पाठवत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे या पथकाने २० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास मॅकडोनाल्ड बिग बाजार, कापूरबावडी ठाणे येथे धाड टाकून धीरज सिंह (२७, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) याच्यासह महिला दलाला पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी मिळालेल्या पाच पीडित महिलांची या वेळी सुटका करून धीरज सिंह आणि महिला दलालाविरोधात भादंवि कलम ३७०(२), ३७०(३), ३४ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two arrested for operating sex racket