मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 05:30 IST2018-08-05T05:30:57+5:302018-08-05T05:30:59+5:30
क्लास संपल्यावर शाळेबाहेर आलेल्या चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सुनील कोम (२५) आणि विजय पाटील (२०) या दोघांना शुक्रवारी रात्री अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक
ठाणे : क्लास संपल्यावर शाळेबाहेर आलेल्या चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सुनील कोम (२५) आणि विजय पाटील (२०) या दोघांना शुक्रवारी रात्री अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
घोडबंदर रोड परिसरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता क्लास संपवून शाळेबाहेर पडल्याचे पाहून सुनील व विजय या दोघांनी तिचा विनयभंग केला. एक ाने तिचा हात पकडला, तर दुसºयाने तिच्याशी अश्लील हावभाव केले. याप्रकरणी तिने पालकांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठून त्या दोघांविरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर, त्यांना तत्काळ अटक केल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. रत्ने तपास करत आहेत.