उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांना अटक
By सदानंद नाईक | Updated: September 21, 2022 18:31 IST2022-09-21T18:31:24+5:302022-09-21T18:31:35+5:30
उल्हासनगरात शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असून दररोज गुटखा प्रकरणी गुन्हे दाखल होत आहे.

उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांना अटक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ परिसरातील बालाजी पान शॉप व जय अंम्बे किराणा दुकानात तंबाखूजन्य गुटखाची विक्री होत असताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त कीर्ती देशमुख यांच्या पथकाने पकडला. याप्रकरणी दोघांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगरात शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असून दररोज गुटखा प्रकरणी गुन्हे दाखल होत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त कीर्ती देशमुख यांच्या पथकाने कॅम्प नं-२ मधील शिरू चौकातील बालाजी पान शॉप मध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजता धाड टाकून गुटखा पकडला. पान शॉपचे दुर्गेशसिंग राघवेंद्रसिंग ठाकूर यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तसेच जय अंम्बे किराणा दुकानात गुटखा सापडला असून दुकानाचे मालक राजकुमार कुरणे यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहराला टार्गेट केले असून शासन बंदी असलेला तंबाखूजन्य गुटखा पकडत आहेत. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.