८ लाख लाटल्याप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: February 13, 2017 04:55 IST2017-02-13T04:55:00+5:302017-02-13T04:55:00+5:30
मुंबईत राहणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना ३० टक्के वाढीव पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून आठ लाख रूपये घेतल्याची घटना उघडकीस

८ लाख लाटल्याप्रकरणी दोघांना अटक
कल्याण : मुंबईत राहणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना ३० टक्के वाढीव पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून आठ लाख रूपये घेतल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर तिघांचा शोध सुरू आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये व्यापारी सुशील चड्डा आणि त्यांचा मित्र कमलेश यांनी प्रवीण व त्याचे साथीदार परवेज खान, खान भाई, इरफान शेख, फिरोज यांना ८ लाख रुपये ३० टक्के वाढीव पैशांच्या आमिषापोटी दिले होते. हा व्यवहार कल्याण-शीळ रोडवरील एका हॉटेलमध्ये झाला. परंतु, मुदतीनंतरही चड्डा आणि कमलेश यांना दिलेले पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी चड्डा यांच्या फिर्यादीवरून कुणाल ऊर्फ प्रवीण सुखसागर वर्मा, परवेज खान, खान भाई, इरफान शेख, फिरोज या पाच जणांविरोधात मानपाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कुणाल आणि परवेजला अटक केली आहे. तर, अन्य तिघांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)