शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरला खंडणी मागणार्‍या कल्याण येथील पत्रकारासह दोन आरोपी पोलीस कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:51 IST

काही आठवड्यांपूर्वीच खंडणीच्या एका प्रकरणात भिवंडी येथील पत्रकारास अटक केल्यानंतर, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी कल्याण येथील एका पत्रकारास बेड्या ठोकल्या. सायन येथील एका बांधकाम व्यावसायिकाला या पत्रकाराने खंडणीपोटी सव्वा कोटीचे चार फ्लॅट मागितले होते.

ठळक मुद्देदोन आरोपींचा समावेशखंडणीपोटी मागितले होते चार फ्लॅटबदनामी करणार्‍या बातमीचे लावले होते फ्लेक्स

ठाणे : बदनामीची धमकी देऊन सायन येथील एका बांधकाम व्यावसायिकास सव्वा कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या एका पत्रकारासह दोघांना खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री ठाण्यात रंगेहाथ अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सायन पूर्व येथे गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी करणाºया एका बांधकाम व्यावसायिकाला कल्याण येथील पत्रकार सिद्धार्थ अशोक मोकळ गत काही दिवसांपासून खंडणीची मागणी करीत होता. जवळपास सव्वा कोटी रुपये किमतीचे चार फ्लॅट न दिल्यास आपल्या साप्ताहिक राजकीय दर्शनच्या माध्यमातून प्रकल्पाची बदनामी करण्याची धमकी त्याने वारंवार दिली. सुरूवातीला व्यावसायिकाने त्याच्या धमक्यांना भीक घातली नाही. त्यामुळे मोकळने त्याच्या साप्ताहिकामध्ये प्रकल्पाच्या विरोधात बातमी प्रकाशित करून, त्या बातमीचे फ्लेक्स प्रकल्पासमोर लावले. बाजारपेठेतील मंदिमुळे व्यावसायिक अगोदरच त्रस्त असताना, मोकळने केलेल्या उपद्व्यापामुळे गृहनिर्माण प्रकल्पाची विश्वासार्हता धोक्यात आली होती. मोकळचा उद्योग एवढ्यावर थांबला नाही. त्याने प्रकल्पाच्या विरोधात चित्रफित तयार करून तीदेखील ‘यू ट्युब’वर प्रसारित केली. या त्रासाला कंटाळून बांधकाम व्यावसायिकाने त्याचे कॉल रेकॉर्ड केले. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली. ठरल्याप्रमाणे व्यावसायिकाने मोकळशी वाटाघाटी करून पाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम घेण्यासाठी मोकळ आणि त्याचा भांडुप येथील साथीदार सतीश सरोज गुरूवारी रात्री खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयासमोरच असलेल्या शासकीय विश्रामगृहाजवळ आला. पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले यांनी येथे अगोदरच सापळा रचला होता. मोकळने बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणीची रक्कम स्विकारताच पोलिसांनी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सिद्धार्थ मोकळचा साथीदार सतीश सरोज हा खंडणी स्विकारताना त्याच्या सोबत होता. मोकळने व्यावसायिकाकडून पैशाची पिशवी घेतल्यानंतर सरोजच्या हातात दिली. या गुन्ह्यातील त्याचा सहभाग तपासला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा