शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हरित शिक्षक पुरस्कार स्पर्धेत राज्यभरात ठाण्याचे तुषार सापळे अव्वल

By सुरेश लोखंडे | Updated: February 26, 2024 19:34 IST

द्वितीय पारितोषिक नाबर गुरुजी विद्यालय दादर येथील रूपाली देवरे आणि तर तृतीय क्रमांक क.भी देशपांडे हायस्कूल बारामती पुणे येथील सोमनाथ गावित यांनी पटकावला.

ठाणेपर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'वनशक्ती' संस्थेमार्फत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांमध्ये पर्यावरणावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे दिला जाणारा हरित शिक्षक- २०२४ स्पर्धेत यावर्षी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, शहापूर नंबर-१ शाळेतील तुषार सापळे हे शिक्षक अव्वल ठरले आहे तर  द्वितीय पारितोषिक नाबर गुरुजी विद्यालय दादर येथील रूपाली देवरे आणि तर तृतीय क्रमांक क.भी देशपांडे हायस्कूल बारामती पुणे येथील सोमनाथ गावित  यांनी पटकावला.    रविवार  ठाणे येथील नरेंद्र बल्लाळ सभागृह पाचपाखाडी येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक रोख वीस हजार, द्वितीय क्रमांक पंधरा हजार, तृतीय क्रमांकास दहा हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप होते. पर्यावरण, वन्यजीव,जैवविविधता, नद्या, तलाव, माती, संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी आदी  विषयांवर या स्पर्धेमध्ये प्रश्न विचारले गेले.

३० गुणांच्या चाळणी  परीक्षेत पात्र ठरलेल्या  स्पर्धकांची प्रत्यक्ष परीक्षा रविवार रोजी ठाणे येथे पार पाडली. स्पर्धेचे परीक्षण बांदोडकर विद्यालय ठाणे च्या जैवविविधता, वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापन विभागाच्या माजी प्रमुख डॉ. पूनम कर्वे, हरित शिक्षक २०२३ च्या गतविजेत्या डॉ.राजश्री माने यांनी केले. पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी यावर्षीचे अव्वल विजेते तुषार सापळे यांना परीक्षक म्हणून सन्मान मिळणार असल्याने शहापूर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षक