‘गुप्तेरोड, एव्हरेस्ट परिसरतील पथदिवे सुरू करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST2021-06-16T04:52:13+5:302021-06-16T04:52:13+5:30

डोंबिवली : केडीएमसीच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील घनश्याम गुप्ते रोड, स्वामी विवेकानंद शाळा, राणाप्रताप शाखा परिसर, एव्हरेस्ट सोसायटी येथील ...

‘Turn on streetlights in Gupteroad, Everest area’ | ‘गुप्तेरोड, एव्हरेस्ट परिसरतील पथदिवे सुरू करा’

‘गुप्तेरोड, एव्हरेस्ट परिसरतील पथदिवे सुरू करा’

डोंबिवली : केडीएमसीच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील घनश्याम गुप्ते रोड, स्वामी विवेकानंद शाळा, राणाप्रताप शाखा परिसर, एव्हरेस्ट सोसायटी येथील पथदिवे तीन आठवड्यांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे.

पश्चिमेतील या परिसरात सुरू असलेले रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम काही कारणांनी थांबले आहे. सायंकाळनंतर पथदिव्यांअभावी अंधारामुळे रस्ते दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्यांत कोणी पाय अडकून पडले किंवा कोणाला दुखापत झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तर, काही ठिकाणी चांगल्या रस्त्यांवरील पथदिवे दिवसाही सुरू असतात. याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘जिथे काम सुरू असतील, तिथे तांत्रिक समस्या असू शकते. विद्युत विभागाला याबाबतची माहिती देऊन ही समस्या सोडवण्यात येईल.’

--------

Web Title: ‘Turn on streetlights in Gupteroad, Everest area’