शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठीचा टग उलटला, एक बेपत्ता; पाच जणांना वाचवण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:42 IST

Wadhwan Port Project: मागील काही दिवसांपासून वाढवण, तारापूर गावाच्या समुद्रात १९ डिग्री ५७.५ N ०७२ डिग्री ३५.४E अंतरावर एक तराफा उभारण्यात आला. 

- हितेन नाईक, पालघरवाढवण बंदर भराव सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यासाठी साठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा अमृत XVI हा लोखंडी टग समुद्रात गेला होत. बुधवारी मध्यरात्री समुद्राला आलेल्या भरतीमुळे तो खडकावर आदळला आणि उलटला. पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात राहुल यादव (वय 23 वर्ष) हा कामगार समुद्रात फेकला गेला. तो बेपत्ता असून, अन्य ५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाढवण बंदराचे कुठलेही काम स्थानिकांच्या विरोधामुळे आजपर्यंत सुरू झालेले नसून, समुद्रात बंदर उभारणीच्या अनुषंगाने वेगवेगळे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून वाढवण, तारापूर गावाच्या समुद्रात १९ डिग्री ५७.५ N ०७२ डिग्री ३५.४E अंतरावर एक तराफा उभारण्यात आला. 

त्याला खेचून नेण्याचे काम करण्यासाठी डहाणू येथून गेलेल्या एका स्थानिक मच्छीमार बोटीला भाडे तत्त्वावर नेण्यात आले होते. मात्र, वरोर येथील स्थानिक मच्छीमारांनी समुद्रात जाऊन त्या डहाणू येथील बोटीला परत जाण्यास भाग पाडले. त्यामुळे आठ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा अमृत नावाचा १६ मीटर लांब टग ६ खलाशी कामगारासह मदतीला पाठविण्यात आला होता.

समुद्रात गेल्यानंतर काय घडलं?

बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती येऊ लागल्याने हा टग वाढवण बंदराच्या समोरील शंखोद्वार समोर खडका जवळ उभा असताना समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार लाटांनी हेलकावे खाऊन उलटला. 

त्यातील ६ कामगारांनी आपले प्राण वाचविण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. परंतु राहुल कुमार यादव या कामगाराने मारलेल्या उडी नंतर टग त्याच्या अंगावर उलटल्यामुळे तो समुद्रात बेपत्ता झाला असावा, असा तर्क अन्य कामगारांनी व्यक्त केल्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी लोकमतला सांगितले. 

या घटनेनंतर समुद्रात फेकल्या गेलेल्या पवन कुमार देवराम (वय २९, रा. बिहार), धर्मेंद्र कुमार सिंग (वय ४३, बिहार), गोविंद कुमार महतो (वय १९ वर्ष, बिहार), सुरज विश्वकर्मा (वय ३७, रा.उत्तर प्रदेश), जशन पठाणिया (वय २०, रा.पंजाब) या पाच कामगारांना बाजूच्या टगमधील कामगारांनी वाचवले. 

समुद्रात बेपत्ता झालेल्या राहुल यादव या कामगाराचा शोध घेण्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व मच्छीमार आणि सहकारी संस्थांना आवाहन करून अशी व्यक्ती समुद्रात आढळून आल्यास तात्काळ आपल्या कार्यालयाला किंवा संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन केले आहे. 

पाच कामगारांना सकाळी डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Wadhwan Port Survey Tug Capsizes: One Missing, Five Rescued

Web Summary : A tugboat involved in the Wadhwan port survey capsized due to high tide, leaving one worker missing. Five others were rescued and hospitalized. The incident occurred near Shankhodwar, halting survey work amidst local opposition to the port project.
टॅग्स :palgharपालघरAccidentअपघातViral Videoव्हायरल व्हिडिओ