शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्टी करप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन ठाण्यात लुटमारीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:58 IST

अ‍ॅन्टी करप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन पाच जणांच्या टोळक्याने ठाण्यातील खासगी क्लास चालकाला लुटण्याचा प्रयत्न केला. आपण सीसीटीव्हीमध्ये कैद होत असल्याचे लक्षात येताच या टोळीने तिथून पळ काढला.

ठळक मुद्देचार ते पाच जणांच्या टोळीचा क्लासमध्ये शिरकावरेड टाकण्याचा केला बनावतीन पेट्रोल पंप परिसरातील घटना

ठाणे: अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करीत एका खासगी क्लासेसमध्ये येऊन ‘रेड’ चा बनाव करणा-या पाच जणांच्या टोळीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीच्या नावाखाली अशी फसवणूक करणारी नेमकी कोणती टोळी कार्यरत आहे, याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्याच्या तीन पेट्रोल पंप येथील बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेणाºया क्लासेसमध्ये २८ एप्रिल २०१८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या टोळीने शिरकाव केला. ‘आम्ही एसीबीचे अधिकारी असून क्लासमध्ये तुम्ही अव्वाच्या सव्वा फी घेता, त्यामुळे आम्ही याठिकाणी रेड टाकली आहे,’ असा कांगावा या तथाकथित अधिका-यांनी केला. खाली उभ्या असलेल्या कारमध्ये वरिष्ठ अधिकारी असून क्लासची संपूर्ण तपासणी करायची आहे. त्यामुळे तुम्हाला काही रक्कमही द्यावी लागेल, असाही दावा या अधिकाºयांनी क्लासेसचे मुख्य प्राध्यापक अलवेन जेविन परेझ यांच्याकडे केला. साधारण दुपारी ४.३० पर्यंत या टोळीचे रेड- नाटय सुरु होते. प्रा. अलवेन यांच्या मदतीला क्लासेसचे इतर कर्मचारी आले. शिवाय, त्यांच्यापैकी एकाने सीसीटीव्हीकडे पाहिल्यानंतर इथे सीसीटीव्ही आहे, असे म्हणून या टोळीने तिथून काढता पाय घेतला. नंतर त्यांनी ठाण्याच्या एसीबीच्या कार्यालयात चौकशी केल्यानंतर असे कोणतेही अधिकारी छापा टाकण्यासाठी या क्लासेसमध्ये गेलेच नव्हते, अशी माहितीही उघड झाली. आपली फसवणूक झाली असून कोणीतरी पैसे उकळण्यासाठी हा बनाव केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी २ मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा