पत्नीला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: October 1, 2016 21:25 IST2016-10-01T21:25:37+5:302016-10-01T21:25:37+5:30

चारित्र्यावर संशय घेत विरारमध्ये एका पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

Trying to burn the wife alive | पत्नीला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न

पत्नीला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
विरार, दि. १ - चारित्र्यावर संशय घेत विरारमध्ये एका पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी 50 टक्के भाजली असून कांदिवली येथील जनशताब्दी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
विरार बरफपाडा येथे राहणाऱ्या विजय किशन वाघ याचे लक्ष्मी बरोबर 2010 मध्ये लग्न झाले होते. त्याला तीन मुली आहेत. विजय कॅटर्सचे काम करतो. कामासाठी सतत बाहेर असल्याने तो आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता. काल तो कामावरून घरी आला असता त्याची पत्नी घरी नव्हती, ती घरी आल्यावर त्याने तिला कुठे गेली होतीस? यावरून मारहाण करायला सुरवात केली. आणि रागाच्या भरात तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 
पण लक्ष्मी पतीच्या हातातून निसटून घराबाहेर पडली आणि तिचा जीव वाचला. पण यात लक्ष्मी 50 टक्के भाजली आहे. पोलिसांनी किसनला ताब्यात घेऊन 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Trying to burn the wife alive