ब्रेक निकामी झाल्याने ट्रकला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:41+5:302021-06-01T04:30:41+5:30
अंबरनाथ : पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पुतळ्याच्या संरक्षक कठड्याला सोमवारी सायंकाळी रेडीमिक्स काँक्रीटच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या ...

ब्रेक निकामी झाल्याने ट्रकला अपघात
अंबरनाथ : पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पुतळ्याच्या संरक्षक कठड्याला सोमवारी सायंकाळी रेडीमिक्स काँक्रीटच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. अपघातात एक रिक्षा व दुचाकीचे तसेच संरक्षक कठड्याचे नुकसान झाले.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पूर्वेतील वडवली वेल्फेअर सेंटर येथून निघालेला रेडीमिक्स काँक्रीटचा ट्रक ब्रेक निकामी झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संरक्षक कठड्यावर आदळला. संरक्षक कठडे तोडून या ट्रकने एक दुचाकी आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने आरडाओरडा करून नागरिकांना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले. त्यामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांची पळापळ झाली. पोलिसांनी रस्त्यावरील वाहनांनाही सावध केले. त्यामुळे मोठा अपघात टळला.
------------फोटो आहे
.........
वाचली