ब्लेडचा धाक दाखवून चालकाला लुटणारे त्रिकुट गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST2021-05-10T04:40:21+5:302021-05-10T04:40:21+5:30

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर एका टेम्पो चालकाला धारधार ब्लेडचा धाक दाखवून जबरीने लुटण्याचा प्रकार शनिवारी घडला. या त्रिकुटाचा ...

The trio robbed the driver out of fear of the blade | ब्लेडचा धाक दाखवून चालकाला लुटणारे त्रिकुट गजाआड

ब्लेडचा धाक दाखवून चालकाला लुटणारे त्रिकुट गजाआड

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर एका टेम्पो चालकाला धारधार ब्लेडचा धाक दाखवून जबरीने लुटण्याचा प्रकार शनिवारी घडला. या त्रिकुटाचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. सूरज संजू पाटील (वय, २६), संतोष जग्गू सुरेला ऊर्फ पालकवाला, अभिषेक संभाजी देशमुख अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी, मोबाइल आणि काही रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

नाशिकमध्ये राहणारे मोहम्मद जावेद मोहम्मद शरीफ शहा हे नाशिकहून मुंबईला भाजीपाला, तसेच बटाट्याची टेम्पोमधून वाहतूक करतात. शनिवारी पहाटेच्या सुमारास टेम्पो चालक मोहम्मद टेम्पोत बटाटे घेऊन कल्याणला येत होते. त्यावेळी मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली पाडाजवळ या त्रिकुटाने त्यांच्या दुचाकीवरून पाठलाग करीत दुचाकी टेम्पोसमोर आडवी लावली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी टेम्पोच्या केबिनमध्ये घुसून शहा व त्यांच्या साथीदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. शहा यांनी प्रतिकार केला असता या आरोपीने धारदार ब्लेडचा धाक दाखवीत त्यांच्या खिशातील काही रोख रक्कम व मोबाइल हिसकावून पळ काढला. आरोपींनी पळून जाताना टेम्पोच्या काचेवर दगड मारून काचही फोडली. याप्रकरणी शहा यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तिन्ही आरोपींना भिवंडीतील कामतघर परिसरातून २४ तासांच्या आत अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत.

Web Title: The trio robbed the driver out of fear of the blade