दरोड्याच्या तयारीतील त्रिकूट गजाआड

By Admin | Updated: March 19, 2017 02:06 IST2017-03-19T02:06:11+5:302017-03-19T02:06:11+5:30

ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले असून, तिघे फरार झाले आहेत. अटकेतील त्रिकुटाकडून दोन बंदुकांसह

Trikou Gagaad ready for the robbery | दरोड्याच्या तयारीतील त्रिकूट गजाआड

दरोड्याच्या तयारीतील त्रिकूट गजाआड

ठाणे : ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले असून, तिघे फरार झाले आहेत. अटकेतील त्रिकुटाकडून दोन बंदुकांसह गुप्ती हस्तगत केली आहे.
घोडबंदर रोडवरील गायमुख बसस्टॉप येथे शुक्रवारी सायंकाळी सराईत राजन नामक गुन्हेगार, हा त्याच्या काही साथीदारांसह दरोडा घालण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलीस नाईक रिझवान सय्यद यांना मिळाली होती. त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखा-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखा-१ व भिवंडी गुन्हे शाखा-२ यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून कारवाई केली. यामध्ये राजन अशोक सिंग (२५), हरिशंकर समशेरबहादूर सिंग (२४) आणि अतुल हरिनाथ यादव (२५) रा. नालासोपारा येथील तिघांना अटक केली.
या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल करीत आहेत.
ही कामगिरी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, समीर अहिरराव, श्रीशैल चिवडशेट्टी, प्रकाश पाटील या पथकाने केली. (प्रतिनिधी)

Web Title: Trikou Gagaad ready for the robbery