शहापूरमध्ये तिरंग्याचे वाटप
By Admin | Updated: January 26, 2017 03:06 IST2017-01-26T03:06:27+5:302017-01-26T03:06:27+5:30
आधार प्रतिष्ठान संस्थेतर्फे किल्ले माहुली परिसरातील चांदरोटी या माध्यमिक विद्यालयात राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. चांदरोटी माध्यमिक

शहापूरमध्ये तिरंग्याचे वाटप
शहापूर : आधार प्रतिष्ठान संस्थेतर्फे किल्ले माहुली परिसरातील चांदरोटी या माध्यमिक विद्यालयात राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
चांदरोटी माध्यमिक विद्यालयात झालेल्या छोटेखानी समारंभप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन नारायण अंदाडे, आधार प्रतिष्ठानचे संस्थापक बाळ जगे, अध्यक्ष नागेश घुमरे, माजी सरपंच कृष्णा पवार, राम अधिकारी, अगिवले, साळवी अमेय आठवले, सुरेंद्र साळवी, आदी उपस्थित होते. आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश घुमरे यांनी गेल्या १० वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे आदिवासीपाड्यातील शाळांना, गावांना आणि ग्रामपंचायतींना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ध्वजाचे महत्त्व विशद करून त्याचे वाटप करण्याचा उपक्र म राबवला जात असल्याची माहिती देत आदिवासी भागात राष्ट्रध्वजाचा सन्मान व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता. (वार्ताहर)