सामूहिक बलात्कार करून आदिवासी महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:35 AM2019-09-17T00:35:28+5:302019-09-17T00:35:34+5:30

भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

Tribal woman murdered by gang rape | सामूहिक बलात्कार करून आदिवासी महिलेची हत्या

सामूहिक बलात्कार करून आदिवासी महिलेची हत्या

Next

भिवंडी : भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी २४ तासांत हत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील कामगार महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची साडीच्या पदराने गळा आवळून हत्या करण्यात आली. पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील तरु णाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याला एका चाळीच्या छताला टांगण्यात आले, तर धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाऱ्या सख्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन एकाची हत्या करण्यात आली.
गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील महिला अन्य महिलांसोबत वालीव, ता. वसई येथून एसटीने कामावरून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी महाळुंगे बसस्टॉपवर उतरून दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली. तिच्या घराकडे जाणारा रस्ता झाडाझुडुपांतून असल्याने अचानक तिला दोघांनी अडवले व उचलून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली.
या घटनेप्रकरणी नितीन नारायण भोसले व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गणेशपुरी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ व ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास एपीआय महेश सगडे करीत आहे.
पडघ्यालगतच्या कुरु ंद गावातील सागर सुरेश पठारे (२७) या तरु णाचा मृतदेह कुरु ंदच्या दाता आदिवासीवाडी येथील साईनाथ भोईर यांच्या चाळीतील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. सागर रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासीवाडी येथील गणपतीला गेला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र, त्याने गळफास घेतल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली गेली असावी, असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रु ग्णालयात पाठवला असून तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.
>भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणाºया सख्ख्या मेहुण्यांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून मेहुण्याने सख्ख्या भावोजींची हत्या केल्याची घटना घडली आहे. अमिन जलील शेख हे भावोजीचे नाव आहे.
त्याचे धामणगाव येथे ‘ए-वन केशकर्तनालय’ दुकान असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (३०) हा काम करीत होता. मात्र, अरमान यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे अमिन हा त्यास विरोध करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले.
यावेळी अरमान याने अमिन याच्या डोक्यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. आरोपी अरमान याची भिवंडी न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करत आहेत.

Web Title: Tribal woman murdered by gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.