नगरसेवकाच्या गाडीवर झाडाची फांदी पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:28+5:302021-05-25T04:45:28+5:30
ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेट क्रमांक दोन येथील रस्त्यावर शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांच्या उभ्या केलेल्या इनोव्हा करिस्ट ...

नगरसेवकाच्या गाडीवर झाडाची फांदी पडली
ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेट क्रमांक दोन येथील रस्त्यावर शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांच्या उभ्या केलेल्या इनोव्हा करिस्ट या मोटारीसह एका रिक्षावर झाडाची फांदी तुटून पडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
मुख्यालयाच्या बाहेर असलेल्या टीएमटी बस थांब्याजवळ रेपाळे यांची गाडी उभी होती. तसेच तेथे हरिशंकर वर्मा यांनी रिक्षा उभी केली होती. अचानक महापालिकेच्या आवारातील झाडाची फांदी तुटून उभ्या केलेल्या वाहनांवर पडली. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, तातडीने ती फांदी बाजूला केली. फांदी पडली तेव्हा सुदैवाने दोन्ही गाड्यांमध्ये कोणीही नव्हते, अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
........
वाचली