शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मैदानांत बांधकाम बंदीचा वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय; उद्यानांमध्ये २० टक्केच बांधकामाला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 01:11 IST

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ठाणे : ठाणे शहरात आधीच खेळाची मैदाने आणि उद्याने कमी राहिली आहेत. आहेत त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. काही उद्याने आणि मैदानांच्या आड समाज मंदिर अथवा इतर काही कट्टे सुरु आहेत. ते आता उर्वरित मैदाने अथवा उद्यानांमध्ये असणार नाहीत. यापुढे उद्यानांमध्ये केवळ २० टक्के बांधकामाला परवानगी दिली जाणार असून, खेळाच्या मैदानांमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम होऊ दिले जाणार नसल्याचे मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षेताखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत सदस्य विक्रांत तावडे यांनी या मुद्याला हात घातला. शहरातील उद्यानांची दूरवस्था झालेली आहे. खेळाच्या मैदानांच्या ठिकाणी बांधकामे होत आहेत. त्यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांचा फारसा विरंगुळा होताना दिसत नाही. खेळाच्या मैदानांच्या ठिकाणीदेखील समाज मंदिर उभारण्याच्या नादात मैदानावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यापुढे उद्यानांमध्ये कमीतकमी बांधकाम, म्हणजेच सिव्हील वर्क व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याअनुषगांने आयुक्तांनी उद्यानांमध्ये २० टक्केच बांधकामांना यापुढे परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले. इतर कोणतेही बांधकाम उद्यानांत होणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. मैदानांमध्ये संरक्षक भिंतीखेरीज इतर कोणतेही बांधकाम यापुढे होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाण्यात लवकरच फ्लॉवर गार्डन; घोडबंदरला घेणार जागेचा शोधनाशिक, कोलकाता, उटी आदी ठिकाणी फ्लॉवर गार्डन आणि बॉटनिकल गार्डन विकसित केले आहे. आता ठाण्यातही फ्लॉवर गार्डन विकसित करण्याची तयारी ठाणे महापालिकेने केली आहे. यासंदर्भात मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय झालो. त्यामुळे बॉटनिकलच्या विद्यार्थ्यांनाही उद्यानाचा फायदा होऊ शकणार असल्याचे मत प्राधिकरण सदस्य नम्रता भोसले यांनी व्यक्त केले. त्यानुसार घोडबंदर परिसरात जागेचा शोध घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विषयांच्या अनुषगांना भोसले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कोलकाता, उटी, नाशिक आदींसह देशाच्या बहुतेक महानगरांमध्ये अशा पद्धतीने उद्याने विकसित होत आहेत. ठाण्यात दरवर्षी वृक्षवल्लीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या आणि फुलांची ओळख होत असते. या प्रदर्शनाला ठाणेकरांचा दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असतो. परंतु,आता प्रदर्शन भरवतानाच खºया अर्थाने अशा प्रकारचे उद्यान ठाण्यातच तयार केले तर त्याचे अनेक फायदे होणार असल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले. पर्यटनस्थळ म्हणूनही ते विकसित होऊ शकणार आहे. तसेच बॉटिनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना येथे प्रत्यक्षात अभ्यास करण्याची संधीदेखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे असे उद्यान विकसित करावे अशी मागणी भोसले यांनी केली. त्यानुसार याचा अभ्यास करून येत्या काळात त्यादृष्टीने काय करता येईल, हे निश्चित केले जाणार आहे. यासाठी घोडबंदर भागातील मुल्ला बाग येथील उद्यानाच्या एका पार्टमध्ये हे उद्यान विकसित करता येऊ शकते का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका