शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

अत्रे कट्ट्यावर उलगडला सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 5:19 PM

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवास उलगडण्यात आला.

ठळक मुद्दे अत्रे कट्ट्यावर उलगडला सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवासआचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मुलाखत अद्वितीय कार्य ठाणेकरांसमोर आणले

ठाणे: अत्रे कट्टयावर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवास त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आला. ठाण्यातील पुरूषोत्तम प्रभू, राजश्री भावे, सुधा गोखले, शंकर आपटे या चारही ज्येष्ठ नागरिक आपल्या या वयातही सामाजिक कायार्ची आवड जोपासत असून ते समाजासाठी कसे धडपडत आहे हे त्यांनी यावेळी अनेक प्रसंग, किस्से आणि अनुभवातून सांगितले.           आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने अत्रे कट्ट्यावर संपदा वागळे यांनी या चारही ज्येष्ठांची मुलाखत घेऊन त्यांचे अद्वितीय कार्य ठाणेकरांसमोर आणले. वृद्धांना घराबाहेरील कामासाठी नेण्यासाठी स्वयंसेवक माया केअर या संस्थेमार्फत पुरविण्यात येतात. या संस्थेत सुधा गोखले यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. गेली दहा वर्षे ते या संस्थेत समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या माया केअरचा त्यांनी प्रवास उलगडला तसेच, २०१२ पासून चैतन्य वृद्धाश्रमात त्या काम करीत असून तेथील कार्याबद्दलही माहिती दिली. ज्या वृद्धांना मदतीसाठी स्वयंसेवक हवे असल्यास त्यांनी माया केअरशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. राष्ट्रीय पुरस्कारासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रस्ताव दिल्लीला पाठविणाºया शंकर आपटे यांनी त्यांना आलेले अनेक कटु - चांगले अनुभव सांगितले. ठाण्यात काही दिवसांपुर्वी एक महिला स्पीड ब्रेकरवरुन पडली असता तेथील दोन वाहतूक पोलीसांनी तिला मदत केली. अशा पोलीसांना सरकारी योजनेत मदत मिळते हे मला माहित असल्याने त्यांचा सन्मान व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या अनेक योजना असतात त्याबद्दल काहींना माहीत असतात तर काहींना नाही आणि ज्यांना माहित असतात ते इतरांना सांगण्याचे कष्टही घेत नसल्याची खंत आपटे यांनी व्यक्त केली. ठाणे पुर्व येथील मरगळीस आलेला विरंगुळा केंद्राचे अध्यक्षपद घेतल्यावर त्या केंद्राला पुनर्जीवन देण्याचे काम केले. त्यानंतर आता अनेक ज्येष्ठांच्या करमणूकीचे कार्यक्रम तेथे होत असून बरेच कट्टेकरी तेथे येतात असे प्रभू यांनी सांगितले. रोज ठाणे ते कल्याण असा प्रवास करीत असताना अनेक लहान मुले हरवितात किंवा अनेकांची महत्त्वाची कागदपत्रे हरवितात, ती सुखरुप पोहोचविण्याचे काम करणाºया भावे यांनी आपल्याला या कामात आलेले अनेक चांगले वाईट प्रसंग सांगितले. तसेच, रस्त्यावर कोपºयात, झाडांच्या आजूबाजूला देवाचे फोटो, मुर्ती, देव्हारे ठेवलेले असतात ते पर्यावरणपद्धतीने विसर्जन केले जाते या कार्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या हे काम चांगले की वाईट याचा मी कधीच विचार केला नाही. परंतू सुरूवातीला मी हे देव गोळा करीत असताना मला वाटायचे हे देव रस्त्यावर का? सुरूवातीला तीन ते चार वर्षे कल्याण येथील गणेशघाटात विसर्जन करायची. मग पर्यावरण ही संकल्पना राबविली जाऊ लागली, त्यावेळी वाटले आपण हे विसर्जन करताना काही चुकतंय का़? अशा पद्धतीचे विसर्जन पर्यावरणाला घातक असल्याचे लक्षात आल्यावर मग हे देव घरी आणून पर्यावरणपुरक पद्धतीने विसर्जन करु लागले. कोणतेही कार्य करताना वय, वजन, उंची हे आड येत नसते. फक्त तुमचे मन चांगले हवे, प्रामाणिकपणे काम करणे आणि देवाला घाबरता कामा नये.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक