परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 4, 2025 20:40 IST2025-05-04T20:40:54+5:302025-05-04T20:40:54+5:30
Thane: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी रविवारी तब्बल चार किलोमीटर रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. त्यांच्या कार्यकर्ता राहुल साळुंखे यांनी नवीन रिक्षा घेतली होती आणि ती रिक्षा दाखवण्यासाठी सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात ती आणली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी तब्बल चार किलोमीटर रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. त्यांच्या कार्यकर्ता राहुल साळुंखे यांनी नवीन रिक्षा घेतली होती आणि ती रिक्षा दाखवण्यासाठी सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात ती आणली. त्यावेळी त्या रिक्षाचा क्रमांक पाहून सरनाईक अवाक झाले कारण सरनाईक यांच्या वाहनांची नंबर प्लेट आणि त्या रिक्षा चालकाची नंबर प्लेट सारखी असल्याने ही रिक्षा चालवण्याचा मोह सरनाईकांना आवरला नाही. त्यावेळी आपल्या कार्यालयापासून चार किलोमीटर रिक्षा सरनाईक यांनी चालवली. 7578 हा रिक्षा चालकाचा नंबर होता. रिक्षाच्या मागे त्यांचा कार्यकर्ता साळुंखे आणि त्यांची मुलं बसली होती.