शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालिका आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:51 AM

कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांबाबत केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. गडकरींच्या नाराजीची दखल घेत येथील महापालिकेचे आयुक्त पी.वेलारसू यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.

मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांबाबत केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केलीहोती. गडकरींच्या नाराजीची दखल घेत येथील महापालिकेचे आयुक्त पी.वेलारसू यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. राज्यरस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक या पदावर वेलारसू यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर मत्सव्यवसाय आयुक्त असलेले जी.एम.बोडके यांची कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.जी. बी. पाटील हे उल्हासनगर महापालिकेचे नवे आयुक्त असतील. आतापर्यंत त्या ठिकाणी महापालिका आयुक्त असलेले आर.व्ही. निंबाळकर हे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून जात आहेत. कामगार विभागाचे सहसचिव अरुण विधळे हे नवे मत्सव्यवसाय आयुक्त असतील.औरंगाबादचे शहर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना कचरा आंदोलनप्रकरणी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले असतानाच आज तेथील महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली केली. मुगळीकर हे आता मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे नवे सदस्य सचिव असतील. औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी तूर्त कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.