राज्यातील आरोग्य सेवेच्या ठाण्यासह आठ उपसंचालकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 05:19 PM2018-09-01T17:19:41+5:302018-09-01T17:32:39+5:30

महाराष्ट्र  वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील सहसंचालक, आरोग्य सेवा व उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गातील पदे राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त होते. त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊन प्रशासकयी अडचणी येत असत. यावर मात करण्यासाठी सदर संवर्गातील पदे श्रेणी अवनत करून तात्पुरत्या स्वरूपात भरण्याची बाब शासनाच्या विचाराधी होती. त्यानुसार सहसंचाकल, उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गात पदे श्रेणीअवनत करून त्या पदांवर अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली

Transfers of eight Deputy Directors from Thane to the Health Service of the State | राज्यातील आरोग्य सेवेच्या ठाण्यासह आठ उपसंचालकांच्या बदल्या

आरोग्य सेवेवर परिणाम होऊन प्रशासकयी अडचणी येत असत. यावर मात करण्यासाठी सदर संवर्गातील पदे श्रेणी अवनत करून तात्पुरत्या स्वरूपात भरण्याची बाब शासनाच्या विचाराधी होती

Next
ठळक मुद्देठाणे येथे रिक्त झालेल्या जागेवर मुंबईला आरोग्य सेवा सहायक संचालकपदी असलेल्या डॉ. गौरी व्हटकर ह्या उपसंचालकपदी सहसंचाकल, उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गात पदे श्रेणीअवनत करून त्या पदांवर अधिकाऱ्यांची बदलीआरोग्य सेवेवर परिणाम होऊन प्रशासकयी अडचणी येत असत. यावर मात करण्यासाठी

ठाणे : राज्यातील सहसंचालक, उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गातील पदे श्रेणीअवनत केली आहेत. त्यांची ठिकठिकाणी रिक्त असलेल्या ठिकाणी वर्णी लावण्यात आली. यानुसार सुमारे आठ जणांच्या बदल्या राज्यभरात केल्याचा आदेश गुरूवारी जारी झाला आहे. यामध्ये ठाणे येथे कार्यरत आरोग्य सेवा मुंबई मंडळाचे उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांची बदली नाशिक येथे उपसंचालकपदी झाली आहे.
ठाणे येथे रिक्त झालेल्या जागेवर मुंबईला आरोग्य सेवा सहायक संचालकपदी असलेल्या डॉ. गौरी व्हटकर ह्या उपसंचालकपदी हजर झाल्या. याशिवाय नागपूर सामान्य रूग्णालयाच्या डॉ. पद्मजा जोगेवर यांची बदली पुणे येथील सहसंचालक आरोग्य सेवा येथे झाली. मुंबई येथील सहायक संचालक डॉ. प्रकाश भोई यांची बदली होऊन त्यांना पुणे येथील आरोग्य सेवा सह संचालकपदाची जबाबदारी मिळाली आहे. पुणे येथील सहायक संचालक डॉ. नितीन बिलोलीकर यांची बदली होऊन त्यांना पुणे येथील उपसंचालकपदाची जबाबदारी प्राप्त झाली. ही जागा आधीपासूनच रिक्त होती.
याप्रमाणेच उस्मानाबाद येथील सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांची देखील बदली झाली. त्यांना लातून येथील उपसंचालकपदाची जबाबदारी मिळाली. नागपूर प्रादेशिक मनोरूग्णालयाचे अधीक्षक डॉ. फारूखी रियाज अहमद शेखचंद यांची ही बदली झाली. त्यांना अकोला येथील उपसंचालक पदाची जाबाबदारी मिळाली. यानंतर कोल्हापूर येथील सहायक संचालक डॉ.पंढरीनाथ धारूरकर यांची बदली होऊन ते आता आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक झाले आहे.
महाराष्ट्र  वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील सहसंचालक, आरोग्य सेवा व उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गातील पदे राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त होते. त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊन प्रशासकयी अडचणी येत असत. यावर मात करण्यासाठी सदर संवर्गातील पदे श्रेणी अवनत करून तात्पुरत्या स्वरूपात भरण्याची बाब शासनाच्या विचाराधी होती. त्यानुसार सहसंचाकल, उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गात पदे श्रेणीअवनत करून त्या पदांवर अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली. यासाठीचा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून शासनाचे अवर सचिव वि. पुं. घोडके यांनी गुरूवारी ३० आॅक्टोबर रोजी जारी केला आहे.

Web Title: Transfers of eight Deputy Directors from Thane to the Health Service of the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.