शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

सेंट्रल मैदानातून पुन्हा भाजी मंडईचे स्थलांतर, तीन रस्त्यांवर आता भरणार मंडई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 2:33 PM

नागरीकांनी सोशल डिस्टेन्सींगचा नियम न पाळल्याने अखेर पालिकेने अवघ्या दोनच दिवसात सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केलेली भाजी मंडई हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शुक्रवार पासून जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर आता नव्याने परवानगी देण्यात आली आहे.

ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने जांभळी नाक्यावरील मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केली होती. मात्र येथेही सोशल डिस्टेन्टसचा नियम पाळला जात नसल्याने अखेर अवघ्या दोनच दिवसात येथील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे आता जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर स्थलांतर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार पासून येथील तीन रस्त्यांवर त्यांना विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.           जांभळी नाका ते स्टेशन पर्यंत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईत गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देण्यासारखीच होती. त्यामुळे येथील ४०० भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे स्थलांतर पालिकेने बुधवार पासून सेंट्रल मैदानात केले होते. परंतु, बुधवारी काही प्रमाणात तेथे गर्दी दिसून आली. मात्र गुरुवारी या ठिकाणी नागरीकांनी सोशल डिस्टेन्टसचा कोणताही नियम पाळला नसल्याचेच दिसून आले. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी आवाहन करुनही नागरीक याला हरताळ फासतांनाच दिसत होते. त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न पालिकेला पडला होता. त्यानुसार गुरुवारी पुन्हा या संदर्भात बैठक घेऊन यावर दुसरा पर्याय पालिकेने पुढे आणला आहे. त्यानुसार जांभळी नाका भागातील तीन रस्ते आता यासाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता येथील सुभाष पथ, शिवाजी पथ आणि चितांमणी चौकातील रस्ते यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने गुरुवारी या तीनही रस्त्यांवर मार्कींग करण्याचे काम सुरु होते. तर या रस्त्याच्या दोनही बाजूला भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना बसविले जाणार आहे. तसेच नागरीकांनी सोशल डिसेन्टीसींगचा नियम पाळावा असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याशिवाय गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहनही पालिकेने केले आहे. दरम्यान आता शुक्रवारपासून या तीनही रस्त्यांवर पहाट पाच ते सकाळी १० वाजेपर्यंत भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMarketबाजार