अग्निशमन विभागातर्फे नागरिकांना प्रशिक्षण
By Admin | Updated: April 24, 2017 02:20 IST2017-04-24T02:20:44+5:302017-04-24T02:20:44+5:30
बदलापूरमध्ये नागरिकांची वस्ती वाढत असल्याने अनेक संकुलांत सुरक्षेच्या उपाययोजनांचा वापर करावा, याची कल्पनाच नसते.

अग्निशमन विभागातर्फे नागरिकांना प्रशिक्षण
बदलापूर : बदलापूरमध्ये नागरिकांची वस्ती वाढत असल्याने अनेक संकुलांत सुरक्षेच्या उपाययोजनांचा वापर करावा, याची कल्पनाच नसते. खासकरून अग्निशमन विभागाशी निगडित सुरक्षासाधनांचा वापर नागरिकांना योग्य प्रकारे करता यावा, यासाठी अग्निशमन विभागाने प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक शिबिर भरवले. सोसायटीमध्ये जाऊन प्रशिक्षण दिले जात आहे. काही विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले.
अग्निसुरक्षा सप्ताहानिमित्त बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन विभागातर्फेबदलापूरमधील शालेय विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाचे काम कसे चालते, याची माहिती फायर आॅफिसर भागवत सोनोने यांनी दिली. या वेळी विद्यार्थ्यांना आग लागू नये, म्हणून घ्यायची काळजी, ज्वलनशील पदार्थांपासून संरक्षण, आग लागल्यास कोणते उपाय करावेत, पावसाळ्यात कुठली काळजी घ्यावी, याची माहिती दिली.
या वेळी अग्निशमन विभागाने काही प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना प्राथमिक प्रशिक्षणही दिले. नागरिक आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन स्थितीत काय करावे, याची कल्पना यावी, हा प्रशिक्षणामागचा हेतू आहे. या प्रशिक्षणाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. आपत्कालीन परिस्थितीत नेमके काय करावे याची कल्पना या प्रशिक्षणातून आली अशी प्रतिक्रीया उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचा निश्चित फायदा होईव्ल असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)