शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशातील गांजाची ठाण्यात तस्करी,  दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 20:21 IST

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलातून ठाण्यात आणलेल्या गांजाची तस्करी करणा-या शाहरूख बिर्ला आणि किरण घुडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांचीही ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

ठाणे : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलातून ठाण्यात आणलेल्या गांजाची तस्करी करणाºया शाहरूख बिर्ला आणि किरण घुडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांचीही ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.बिर्ला याला बुधवारी (२९ नोव्हेंबर रोजी) रात्री १० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे, उपनिरीक्षक मनोहर घाडगे यांच्या पथकाने भिवंडी बायपासजवळील रांजनोलीनाका येथे अटक केली. त्यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील परिसरातून किरणला घाडगे यांच्या पथकाने अटक केली होती. त्याच्याकडून एका कारसह सहा लाख ४१ हजार २०० रुपयांचा २२ किलो गांजा हस्तगत केला. त्याने दिलेल्या माहितीवरूनच शाहरूखला या पथकाने अटक केली. हे दोघेही आंध्र प्रदेशातील गणेशन याच्याकडून हा गांजा ठाण्यात तस्करीसाठी आणत होते. पुण्याचा विशाल मोहिते आणि गणेशन हे दोघे मिळून या गांजाची तस्करी करत होते, अशीही माहिती तपासात उघड झाली. घुडे आणि शाहरूख हे गणेशन याच्याकडून साडेसात हजार रुपये किलोने गांजाची खरेदी करत होते. पुढे ते मुंबई, ठाण्यात १५ हजार रुपये किलोने त्याची विक्री करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.आंध्र प्रदेशात पथक रवानाठाण्यात गांजाची तस्करी करणाºया गणेशन तसेच त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार उत्तम भोसले, दिलीप सोनवणे आणि तुळशीराम टोपले यांचे पथक आता गुरुवारी आंध्र प्रदेशात रवाना झाले आहे. तस्करी करणा-यांच्या अटकेनंतर या प्रकरणात सामील असलेल्या आणखी मोठ्या रॅकेटचाही भंडाफोड होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हाthaneठाणे