शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील मेट्रो चारच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील वाहतूक रविवारपासून रात्रीची 6 दिवस बंद

By सुरेश लोखंडे | Updated: December 23, 2022 18:52 IST

गर्डर टाकण्याच्या कामादरम्यान मुंबई-नाशिक महामागार्ने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

ठाणे येथील मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड येथे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी या रोडवरील वाहतूक २५ ते ३० डिसेंबरपर्यंत रात्री ११.५५ वाजेपासून सकाळी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली. त्यामुळे दरम्यान या मार्गावर येणाऱ्या ठिकठिकाणच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

या गर्डर टाकण्याच्या कामा दरम्यान मुंबई-नाशिक महामागार्ने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांसाठी पयार्यी मार्ग म्हणून मुंबई, ठाणेकडून येणारी वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जाण्यास परवानगी दिली आहे. याप्रमाणेच कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी वाहन जातील.

मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाड़ी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अनुरफाटा मार्गे जातील. याप्रमाणेच नाशिककडून जाणाच्या सर्व वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यामुळे ही वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. तर जड अवजड वाहने सोडून इतर हलकी वाहने ही गर्डर टाकणेचे वेळी ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या दरम्यान मुख्य रस्त्याचे एका वाहिनीने पुढे इच्छित स्थळी जाण्यास परवानगी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMetroमेट्रो