शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

मुंबई-नाशिक महामार्गावर सहा तास वाहतूककोंडी; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 05:55 IST

मालवाहू ट्रक बंद पडल्याने वाहतूककोंडीची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क

कसारा : मालवाहू ट्रक बंद पडल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी सातपासून   वाहतूककोंडी झाली होती. कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास व्यत्यय येत होता. दुपारी एक वाजता म्हणजेच सहा तासांनंतर महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील कोंडी सुटल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

शनिवारी संध्याकाळी सहाच्या   सुमारास जुन्या कसारा घाटातील झिरो पॉईंट वळणावर  कंटेनर उलटल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्यात रविवारी सकाळी मालवाहू ट्रक बंद पडला. बेशिस्त वाहनचालकांमुळे  तो रस्ताही जाम झाला. सकाळी सातपासून वाहनचालक, पर्यटकांना मनस्ताप सोसावा लागला. नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. मार्गिकेवर दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसारा पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलिस, आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य तब्बल सहा तास मेहनत घेत होते.

२० हून अधिक वाहने बंद

- मुंबई-नाशिक महामार्ग सहा तासांनंतर सुरू झाला. मात्र, जवळपास २० हून अधिक लहान-मोठी वाहने रस्त्यात बंद पडली.- त्यामुळे कासवगतीने सुरू झालेला  महामार्ग पुन्हा विस्कळीत झाला. 

कसारा घाटात नियमित होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग, स्थानिक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत  बैठक घेऊन वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात येईल.- मिलिंद शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शहापूर

कसारा घाटात अपघात झाल्यास वाहतूककोंडी होते. अवजड  वाहनांसाठी काही वेळांसाठी कसारा घाटाच्या पायथ्याशी  पार्किंग व्यवस्था केल्यास वाहतूककोंडी होणार नाही. वाहनचालकांची गैरसोय कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. - परमेश्वर कासुळे, तहसीलदार, शहापूर

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबईNashikनाशिक