ठाणे - घोडबंदर रोडवरील जकात नाक्याजवळ टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो उलटल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या टेम्पोतील ऑईल रस्त्यावर पसरल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.टेम्पो च्या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेतली. रस्त्यावरील ऑईल वर मातीचा थर पसरवून हा मार्ग वाहनांसाठी मोकळा करण्यात आला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात टेम्पो अपघातामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 11:58 IST