शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

पूल उभारणीसाठी आज वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 01:30 IST

मुंब्रा येथे उभारणार : ९०० पोलिसांचा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेडअंतर्गत मुंब्रा रेतीबंदर येथे लोखंडी पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी ७ मार्च रोजी दिवसभर या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून, या भागात कोणत्याहीप्रकारे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाण्यासह, पालघर आणि महामार्ग पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

मुंब्रा रेतीबंदर याठिकाणी मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलाद्वारे रेल्वे मार्ग टाकण्याचे व उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. ठाण्याकडून दिवा दिशेने नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता हा मार्ग जोडण्यासाठी मुंब्रा रेतीबंदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर तयार लोखंडी पूल बसविणे गरजेचे आहे. या लोखंडी पुलाची लांबी ८० मीटर, रुंदी सहा मीटर, उंची ११ मीटर आणि वजन ३५५ टन आहे. याच कामासाठी हा राष्ट्रीय महामार्ग रेतीबंदर रेल्वे पुलाच्या ठिकाणी ६ मार्च रोजी रात्री १२ ते ७ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास बंंद ठेवला जाणार आहे. यासाठी वाहतूककोंडी होऊ नये तसेच ती सुरळीत रहावी म्हणून अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.

हे मार्ग राहणार बंद-माजीवडा, खारेगाव टोलनाका, शीळफाटा तसेच नाशिक ते ठाण्याच्या दिशेने येणारा पडघा आणि राजनोलीनाका हे मार्ग या काळात बंद ठेवले जाणार आहेत.पोलिसांचा बंदोबस्त मुंब्रा बायपासच्या आधी ५० मीटरवर लोखंडी पूल उभारणीच्या कामासाठी अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रणासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १८ निरीक्षकांसह ५५० पोलीस आणि १५० वाहतूक वॅार्डन बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, पालघर, मीरा भाईंदर वसई-विरार आणि महामार्ग पोलिसांचा २०० पोलिसांचा तैनात राहणार आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी