तोतया पोलिसांनी केली वृद्धेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:43 IST2021-04-23T04:43:20+5:302021-04-23T04:43:20+5:30

मुंब्रा : तीन तोतया पोलिसांनी एका वृद्धेची फसवणूक करून तिच्या जवळील ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून पोबारा केल्याची ...

Totaya police cheated the old man | तोतया पोलिसांनी केली वृद्धेची फसवणूक

तोतया पोलिसांनी केली वृद्धेची फसवणूक

मुंब्रा : तीन तोतया पोलिसांनी एका वृद्धेची फसवणूक करून तिच्या जवळील ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली. शीळफाटा परिसरात राहाणारी सदर वृद्धा मंगळवारी सकाळी भाजी घेऊन दोस्ती गृहसंकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून घरी चालली होती. त्यावेळी तिच्या मागून आलेल्या दोघांनी आम्ही पोलीस असून, कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही दागिने घालून गेटच्या आतमध्ये जाऊ शकत नाही, असे तिला हिंदीत सांगितले. नंतर जवळील सोन्याचा हार आणि दोन बांगड्या तिला पिशवीत ठेवण्यास सांगितले.. पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने त्यांच्याबरोबर असलेल्या तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्या हातामध्ये घेऊन ते पिशवीत न ठेवता तिघांनी पोबारा केला. बुधवारी याबाबतची तक्रार शीळ-डायघर पोलीस ठाण्यात केली आहे.

Web Title: Totaya police cheated the old man