शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २१५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 11, 2023 04:32 PM2023-12-11T16:32:19+5:302023-12-11T16:33:07+5:30

वर्षभरात आयोजित केलेल्या चार राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले एकूण ८६०७४ प्रकरणे निकाली निघाली आहेत.

total of 21573 pending court cases were disposed of in the last National People's Court | शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २१५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली

शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २१५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली

प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : वर्षभरात आयोजित केलेल्या चार राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले एकूण ८६०७४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २१५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली झाली असून १८५१० दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी मिळून एकूण ४००८३ तडजोड पात्र असलेली प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या सामंजस्याने तडजोड करुन निकाली झाली आहेत, अशी माहीती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वरर सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांचे मार्फत ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व अति. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये अमित एम. शेटे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष, ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, ईश्वर सुर्यवंशी यांचे समन्वयाने शनिवार ९ डिसेंबर, रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.

या निकाली प्रकरणांमध्ये न्यायालयांकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण रक्कम रू. १,७०,७८,२७,६५७/- व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण रू. २८,६५,७२,५१५/- अशी एकूण रू. १,९९,४४,००,१७२/- एवढया रकमेचा समावेश आहे.
 मागील लोकअदालतीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दुसऱ्या वेळेस डीआरटी या कर्ज वसुली प्राधिकरणाकडील प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३१ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली असुन त्या प्रकरणांचे तडजोड मूल्य रक्कम रू. ४८ कोटी १२ लाख ४५ हजार ५२४/- एवढे आहे. मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण २९४ प्रकरणांत तडजोड होवुन पिडीतांना रक्कम रू. २५,९५,०३,९६०/- भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयात एकूण 182 प्रकरणांमध्ये तडजोड होवून रू. १५,६७,०४,९६०/- एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजूर करण्यात आले आहेत. वसई न्यायालयात एका मोटार अपघात दाव्यामध्ये प्रकरणात गो डिजिटल इन्शुरन्स कंपनीकडून उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणुन रूपये २ कोटी ०८ लाख ५० हजार मंजूर करण्यात आले.

Web Title: total of 21573 pending court cases were disposed of in the last National People's Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.