शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये परदेशातून आलेल्या लोकांची संख्या 342वर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 09:14 IST

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत परेदेशातुन परतलेल्या नागरिकांची संख्या ३४२ इतकी झाली असून, या पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली ...

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत परेदेशातुन परतलेल्या नागरिकांची संख्या ३४२ इतकी झाली असून, या पैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली आढळून आलेले नाही. तर शहरात परदेशातून येणा-या नागरिकांची विमानतळ प्राधिकरण व शासनाकडून वेळीच माहिती मिळत नसल्याने आलेल्या नागरिकांची माहिती पालिकेला वेळीच होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.परदेशातुन आलेल्या परंतु कोरोना नसलेल्या नागरिकांना खबरदारी म्हणून १४ दिवसांकरिता अलगीकरण केंद्रात ठेवण्याची आवश्यकता आहे. मीरा भाईंदरमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ३४२ झालेली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली नसली तरी खबरदारी म्हणुन १४ दिवसांकरीता वेगळे ठेवण्याची आवश्यकता असल्याने पालिकेने भाईंदर पूर्वेला पालिका क्रीडा संकुलासमोरील इमारतीत अलगीकरण केंद्र सुरू केले आहे. तेथे सदद्या २५ नागरिकांना खबरदारी म्हणून वेगळे ठेवलेले आहे. २३६ जणांना त्यांच्या राहत्या घरीच ठेवलेले आहे. यातील ८१ जणांनी १४ दिवसांचा वेगळा राहण्याचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. ८ जणांना कस्तुरबा येथे तपासणी साठी पाठवले असता ६ जणांना कोरोनाची लागण नसल्याचा अहवाल आला आहे. तर दोघांचा अहवाल आला नसुन त्यांना सद्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेले आहे.शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व पालिका - शासनांच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान परदेशातुन येणाराया नागरिकांची माहिती पालिकेला मिळत नसुन आुबाजुचे रहिवाशीच असे कोणी आले की पालिकेला कळवत आहेत. त्यातही पालिके कडुन अशा लोकांशी वेळीच संपर्क केला जात नसल्याचे काही प्रकरणात समोर आले आहे. तर असे काही नागरिक परदेशातुन आले तर त्यांच्या कडे जाण्यासाठी वैद्यकिय पथकां कडे स्वतंत्र वाहनेच नसल्याचे देखील उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिकेच्या गाड्या गेल्या कुठे असा सवाल देखील केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस