ठाण्यात एकूण ४२२१ कोविडचे बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:45+5:302021-03-21T04:39:45+5:30
ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज ...

ठाण्यात एकूण ४२२१ कोविडचे बेड
ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून महापालिका क्षेत्रात खासगी हॉस्पिटल व महापालिका मिळून चार हजार २२१ कोविड बेड्सची क्षमता निर्माण केली असल्याची माहिती शनिवारी आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिली.
शहरात सद्य:स्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. यासंदर्भात महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाेबत आयुक्तांनी शनिवारी संयुक्त बैठक आयोजिली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात ४२२१ कोविड बेड्स उपलब्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले.
* अशी आहे बेडची उपलब्धता
ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे कोविड हाॅस्पिटलमध्ये १०७५ बेड, विराज हॉस्पिटलमध्ये ३० बेड, स्वयम हॉस्पिटलमध्ये ३०, ठाणे हेल्थ केअरमध्ये ५३, मेट्रो पोल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपीमध्ये ६०, टायटन हॉस्पिटलमध्ये ६०, कौशल्या मेडिकलमध्ये १००, वेदांत हॉस्पिटलमध्ये १२५, सफायर हॉस्पिटलमध्ये (खारेगाव) १४२, बेथनी हॉस्पिटलमध्ये १९०, हायलँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५०, एकता हॉस्पिटलमध्ये २५, विराज हॉस्पिटलमध्ये ३०, कैझेन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५०, वेदांत मल्टिस्पेसिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे ४५, वेदांत एक्सटेन्शन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर-८५, हॉरीझन प्राइम हॉस्पिटलमध्ये १००, ठाणे नोबल हॉस्पिटल एलएलपीमध्ये ३०, ज्युपिटर हाॅस्पिटलजवळील पार्किंग प्लाझा येथे ११८१ आणि लोढा भायंदरपाडा येथे (टीएमसी)- ७६० बेड्स असे एकूण ४२२१ बेड उपलब्ध केले आहेत.