पिडीत तरु णीवर पोलीस उपनिरीक्षकाचा अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:09 IST2018-11-23T22:05:58+5:302018-11-23T22:09:02+5:30
भिवंडी : अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने पिडीत तरूणीवर तपास करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरातील ...

पिडीत तरु णीवर पोलीस उपनिरीक्षकाचा अत्याचार
भिवंडी: अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने पिडीत तरूणीवर तपास करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.सदर उपनिरिक्षक
शांतीनगर पोलीस ठाण्यात काम करीत असून त्याच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील कफपरेड भागात राहणा-या पीडित तरु णीची काकू शहरातील गायत्रीनगर परिसरात रहात आहे. तीन वर्षापुर्वी सुट्टीच्या दिवशी ती शहरात गायत्रीनगरमध्ये आली होती. त्यावेळी तिच्या मोबाईलचा रिचार्ज संपल्याने ती त्याच परिसरात एका मोबाईलच्या दुकानात रिचार्ज करण्यासाठी गेली असता तिची ओळख दुकानातील सतिश नावाच्या तरूणाबरोबर झाली होती. त्याने तरूणीशी ओळख वाढवून तिच्या सोबत प्रेमाचे नाटक करून फिरण्याच्या बहाण्याने तिला लॉजवर नेले. परंतू सतीशचे झाले असून त्याला दोन मुले असल्याचे समजल्यावर पिडीत तरूणीने त्याच्याबरोबर रहाण्यास नकार दिला. तरी देखील त्याने विविध बहाण्याने तीच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून ती दीड महिन्याची गरोदर राहील्याने तिने सतीशला या घटनेची माहिती दिली. तेंव्हा सतीशने प्रेमाचे नाटक करून तिला गर्भपात करण्याच्या गोळ्या दिल्या. या घटनेची खबर सतीशची पहिली प्रेयसी राबिया हिला लागल्याने पिडीत तरूणी आणि राबीया या दोघींमध्ये वाद निर्माण झाला.दरम्यान राबिया हिने पीडित तरु णीला बहाणा करून तिच्या घरी बुरखा घालून घेवून गेली. घरी जाताच तिने पिडितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर सलीम नावाच्या तरूणास अत्याचार करण्यास सांगून त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ दाखवित राबीयाने पिडीत तरूणीकडून पन्नास हजार रूपयांची मागणी केली.ही रक्कम न दिल्या व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवार पैसे देऊनही राबीयाने ब्ल्ॉकमेलींग करून उत्पन्नाचे साधन बनविले होते. या प्प्रकरणाने आपली समाजात बदनामी होईल या भीतीने पिडीत तरूणीने खडवली नदीत आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असता चीच्या मैत्रिणीने तीला आत्महत्या करण्यापासून रोखले.या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीसांत तीन जणांवर पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले. दरम्यान सतीशला या प्रकरणातून वाचविण्यासाठी आमचे दोघांच्या संमतीने शारीरिक संबध असल्याचे कोर्टाला सांगत त्याच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचा तगादी पिडीत तरूणीने पोलीसांकडे लावला होता. या प्रकरणाचा तपास शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षक गोंजारी यांच्याकडे होता. गोंंजारी याने पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पिडीत तरूणीला देऊन शारीरिक संबध प्रस्थापीत करण्यास सांगीतल्यीची माहिती पिडीत तरूणीने पोलीसांना दिलेल्या जबाबात नमुद केले आहे. त्यानंतर उपनिरिक्षक गोंजारी याने पिडीत तरूणीला १६ आॅगस्ट २०१८ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रांजनोली नाक्यावर बोलाविले.तेथुन कल्याण रेल्वे स्थानका समोरील लॉजमध्ये नेऊन तीच्यावर अत्याचार केले. तत्पुर्वी गोंजारी याने पिडीत तरूणीकडून माझ्या सहखुशीने मी पोलीस उपनिरिक्षक गोंजारी याच्यासोबत शारिरीक संबध ठेवीत आहे,असे कागदावर लिहून घेत तीची सही घेतली. ही सर्व माहिती पिडीत तरूणीने कोनगाव पोलीस ठाण्यातील पोलीसांना दिलेल्या जबानीत नमुद केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक विनायक देशमुख करीत आहेत.