तोरस्कर यांची कविता विभाग प्रमुखपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:16+5:302021-03-22T04:36:16+5:30
ठाणे : साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले ठाणे येथील कवी, लेखक बाळासाहेब तोरस्कर यांची मराठी स्टार फाइव्ह ...

तोरस्कर यांची कविता विभाग प्रमुखपदी निवड
ठाणे : साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले ठाणे येथील कवी, लेखक बाळासाहेब तोरस्कर यांची मराठी स्टार फाइव्ह डाॅट लाइव्ह मोबाइल ॲपच्या कविता विभाग प्रमुखपदी निवड झाली आहे. ही नेमणूक अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी केली आहे. तोरस्कर यांच्या अनेक कवितांच्या व्हिडीओची या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर निवड करण्यात आली आहे.
मराठी भाषा, तसेच मराठमोळ्या कलाकर्मी व साहित्यिक यांच्या कलागुणांना, कथाकवितांना जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी अ.भा. चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार फाइव्ह डाॅट लाइव्ह या मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. कलाकर्मी व साहित्यिक यांना निश्चित उत्पन्न तसेच प्रसिद्धी मिळणार आहे. यात कथाकथन, कविता वाचन, शाॅर्टफिल्म, वेबसीरिज, गाणे, अल्बम, चित्रपट, शाहिरी, भजन, एकपात्री अभिनय अशा विविध कलागुणांना वाव मिळणार आहे. हा उपक्रम मोफत असून कोणत्याही प्रकारची नोंदणी फी आकारली जात नाही. या उपक्रमात कलाकर्मी व साहित्यिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तोरस्कर यांचा प्रीतफुले हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून त्याला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तोरस्कर यांना आतापर्यंत अनेक साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.