शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

लॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 00:35 IST

टोल रद्द करा : अन्यायकारक वसुली रोखण्याची केली मागणी

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊननंतर रस्ते टोलमुक्त करणे आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी टोलची दरवाढ केली असून, १०० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. या मुद्द्याला टोलवसुलीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे श्रीनिवास घाणेकर यांनी हरकत घेतली आहे. सामान्यांना टोलच्या जाचातून मुक्त करण्याऐवजी जास्तीचा टोल लादला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

घाणेकर यांची टोलवसुलीच्या विरोधातील याचिका २०१२ पासून न्यायप्रविष्ट आहे. ते म्हणाले की, लोकल बंद असल्याने नागरिकांना रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने केलेली टोल दरवाढ ही अत्यंत चुकीची आहे. दरवाढच काय याआधी आकारला जात असलेला टोल रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेणे गरजेचे होते. मुंबईच्या एण्ट्री पॉइंटवरील मुलुंड आनंदनगर, मुलुंड एलबीएस, वाशी, दहिसर आणि ऐरोली येथील पाच टोलनाक्यांवर आजही टोलवसुली सुरू आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीत उड्डाणपूल, अंडरपास बांधण्यासाठी एक हजार ५६० कोटी रुपये खर्च झाला होता. पहिल्या चार वर्षांत ४२७ कोटी रुपये, तर नंतर ३८९ कोटी रुपये टोलवसुली करण्यात आली. मात्र, ज्या वाहनांना टोलनाका ओलांडावा लागत नाही, अशा वाहनांना प्रतिलीटर डिझेल व पेट्रोलमागे एक रुपया उपकर लावण्यात आला....मग पुन्हा टोल का?च्बांधकामासाठी झालेला खर्च हा एक हजार ५६० कोटी होता. तर, टोल व उपकराच्या माध्यमातून सरकारला दोन हजार १६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. खर्चाची रक्कम वसूल झाली असताना एमईपी कंपनीकडून सरकारने दोन हजार १०० कोटी रुपये भरून घेतले आहेत. या कंपनीला आता २०२७ पर्यंत टोलवसुलीचे काम दिले आहे. ही कंपनी २०१७ पर्यंत दोन हजार १०० कोटींच्या बदल्यात ११ हजार ८७० कोटी रुपये वसूल करणार आहे.च्वसूल केलेली रक्कम सरकारी तिजोरीत न जाता कंपनीला मिळणार आहे. बांधकाम खर्चाची रक्कम वसूल झालेली असताना पुन्हा टोलवसुलीचे काम देण्यात सरकारला काय स्वारस्य आहे. टोल दरवाढ झाल्याने मुंबईत प्रवेशासाठी आता जास्त टोल भरावा लागणार आहे. या प्रकरणीही घाणेकर यांनी हरकत घेतली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे