टोकावडे पोलीस ठाण्यास नवीन गाडी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST2021-09-07T04:49:44+5:302021-09-07T04:49:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क टोकावडे - टोकावडे पोलीस ठाण्यात नवीन पोलीस गाडीची गरजेची असून, ती दिली जावी, अशी मागणी स्थानिक ...

Tokawde police station should be given a new vehicle | टोकावडे पोलीस ठाण्यास नवीन गाडी द्यावी

टोकावडे पोलीस ठाण्यास नवीन गाडी द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क

टोकावडे - टोकावडे पोलीस ठाण्यात नवीन पोलीस गाडीची गरजेची असून, ती दिली जावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

सन २००७ साली टोकावडे पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी साधी पोलीस जीप गाडी देण्यात आली होती. त्यानंतर दुसरी गाडी देण्यात आली होती, मात्र ही गाडी आता खराब झाली असून, ती बदलून दुसरी देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. कारण या पोलीस स्टेशन अंतर्गत माळशेज घाट असल्याने परिसरात दररोज कुठे ना कुठे अपघात होतात. तसेच टोकवडे पोलीस ठाण्यांतर्गत ९० गावे, खेडीपाडे येत असून, तत्काळ सेवा हे पोलीस देतात. मात्र अनेकदा त्यांची गाडी कुठे तरी बंद असते. त्यामुळे टोकावडे पोलीस ठाण्यास दुसरी नवीन गाडी लवकर द्यावी, यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Tokawde police station should be given a new vehicle